अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरच्या चिंचा साता समुद्रापार ! जगभरात मागणी, मजूर,व्यापारी, शेतकरी झाले मालामाल

Ahmednagar News : चिंच हे फळ सर्वपरिचित आहे. चिंचेला औषधांत, विविध पदार्थांत टाकण्यासाठी प्रचंड मागणी असते. चिंचोक्यालाही तितकीच मागणी असते. अहमदनगर जिल्ह्यात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते.

चिंचेचे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात अहमदनगरमध्ये आहेत. दरम्यान यंदा चिंचेला चांगला बाजार मिळत असल्याने शेतकरी, व्यापारी, मजूर यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे.

यंदा ९ ते १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव चिंचेस मिळत आहे. अहमदनगरमधील चिंचेला सध्या देशभरातून मागणी आहे. विविध देशात देखील अहमदनगरच्या चिंचेची मोठी मागणी वाढली आहे.

चिंचेच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणजे नगर !
नगर हे चिंचेच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले असून मालाची गुणवत्ता व व्यवहारातील पारदर्शकता यामुळे देशभरातील चिंचेचे व्यापारी येथे खरेदीस येतात. सध्या बाजारात हजार गोण्यांची आवक सुरु असल्याचे चित्र आहे. सध्या जगभरात भारतातीलच चिंचेला मागणी होत असल्याने नगरच्या चिंचा सातासमुद्रापार पोहोचत आहेत.

शेतकरी देखील झाले मालामाल
अनेक शेतकऱ्यांनी शेतात चिंचेची झाडे लावलेली आहेत. अनेकांनी बागा देखील केलेल्या आहेत. सध्या बाजारात नऊ हजार रुपये क्विंटल प्रमाणे बाजार भाव अनेक शेतकऱ्यांना मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे.

दरवर्षी चिंचांचे हमखास उत्पादन मिळत असल्याने मुलांचे शिक्षण व घर खर्चाला मोठा आधार मिळत असल्याचे चिंच उत्पादक शेतकरी सांगतात. चिंचेमधून दरवर्षी साधारणपणे पाच ते सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न काढणारे शेतकरी देखील अहमदनगरमध्ये आहेत.

चिंचोकाही करतोय मालामाल
चिंचोकाही सध्या व्यापाऱ्यांना मालामाल करताना दिसत आहे. कारण यंदा चिंचोंक्याचे भाव दुप्पट दुप्पट वाढले आहेत. मागील वर्षी १५०० ते १७०० रुपये क्विंटल असणारे चिंचोक्याचे भाव यंदा ३ हजार रूपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. त्यामुळे चिंचोकाही करतोय मालामाल अशी स्थिती आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts