Ahmednagar News : भाऊबंदामधील वाद, त्यातून निर्माण होणाऱ्या हाणामारीच्या घटना आदी घटना अनेकदा घडलेल्या आपण पाहतो. अनेक ठिकाणी वाद नको म्हणून जमिनीची मोजणी केली जाते. परंतु या मोजणीच्या वेळीच भाऊबंदामध्ये तुफान हाणामाऱ्या झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील निंधेरे येथे घडली आहे.
अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील निंधेरे येथे जागा मोजणीवरून एका कुटंबाच्या भाऊबंदामध्ये वादंग सुरू आहे. जमिनीची मोजणी झाल्यानंतर पोल रोवले जात असतानाच दोन्ही गटात हाणामाऱ्याचा प्रकार घडल्याने परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
निंधेरे येथील सचिन किसन सिनारे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार योगेश संपत सिनारे, संपत भागवत सिनारे व त्यांच्या पत्नी यांनी शासकीय मोजणी झाल्यानंतर मोजणी मान्य नसल्याचे सांगत वाद निर्माण केला. रितसर शासकीय यंत्रणेमार्फत मोजणी होऊन पोल रोवत असताना
आम्हाला मोजणी मान्य नसल्याचे सांगत पोल रोवण्यास विरोध केला. तसेच सचिन सिनारे व त्यांच्या कुटुंबियाला शिविगाळ दगड व लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तर दुसऱ्या तक्रारीनुसार संपत भागवत सिनारे यांनी सांगितले की, आण्णासाहेब पांडूरंग सिनारे,
किसन पांडूरंग सिनारे, प्रविण आण्णासाहेब सिनारे, सचिन किसन सिनारे, वैभव किसन सिनारे यांनी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता संपत सिनारे व त्यांच्या मुलाला शिविगाळ करीत लोखंडी गज व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.