Ahmednagar News : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रिय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते.
बैठकीत नमुद पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या / नेमणुका करण्याविषयी सखोल चर्चा करण्यात येऊन विचार विनिमय करण्यात आला व त्याप्रमाणे त्यांचे बदल्याबाबत / नेमणुकांबाबत सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांचे सध्याचे नेमणुकीचे ठिकाण व नविन नेमणुकीचे ठिकाण-
पो.नि. समाधान नागरे नियंत्रण कक्ष ते शेवगांव पो. ठाणे, पो. नि. दिगंबर भदाणे शेवगांव ते घारगांव पो ठाणे, पो.नि. संतोष खेडकर घारगांव ते जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर, पो.नि. भगवान मथुरे – संगमनेर शहर ते कोपरगांव शहर, पो.नि. बापुसाहेब महाजन जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर ते संगमनेर शहर, पो.नि. दौलत जाधव भरोस सेल ते जिल्हा विशेष शाखा,
अहमदनगर, पो.नि.प्रदिप देशमुख – कोपरगांव शहर ते वाहतुक नियंत्रण शाखा, शिर्डी, पो. नि. राजेंद्र इंगळे वाहतुक नियंत्रण शाखा, शिर्डी ते ए.एच.टी.यु., अहमदनगर, पो. नि. नंदकुमार दुधाळ ए.एच.टी.यु., अहमदनगर ते वाचक पोलिस अधिक्षक कार्यालय, पो. नि. मोरेश्वर पेंदाम शहर वाहतुक नियंत्रण शाखा ते सायबर पोलिस ठाणे, पो.नि. बाबासाहेब बोरसे जिल्हा विशेष शाखा ते शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहमदनगर, पो. नि.नितीनकुमार चव्हाण वाचक पोलिस अधिक्षक कार्यालय ते आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर,
पो.नि. मोहन बोरसे नियंत्रण कक्ष, अहमदनगर ते अकोले पोलिस ठाणे, पो.नि. किरण शिंदे – नियंत्रण कक्ष, अहमदनगर ते श्रीगोंदा, पो. नि. गुलाबराव पाटील अकोले ते नियंत्रण कक्ष, अहमदनगर, पो.नि. ज्ञानेश्वर भोसले श्रीगोंदा ते नियंत्रण कक्ष अहमदनगर. स.पो.नि. जगदिश मुलगीर पाथर्डी ते भिंगार कॅम्प, स.पो.नि. योगेश राजगुरु भिंगार कॅम्प ते नियंत्रण कक्ष अहमदनगर, स.पो.नि. आशिष शेळके – सोनई ते कोपरगाव शहर,
स.पो.नि. विजय माळी कर्जत ते सोनई, स.पो.नि. कुणाल सपकाळे नियंत्रण कक्ष ते अर्ज शाखा, स.पो.नि. रमिझ मुलाणी नव्याने हजर, कर्जत पोलीस स्टेशन, स.पो. नि. मंगेश गोंटला – जळगांव येथुन बदली आदेशाधिन, जामखेड पोलीस स्टेशन, स.पो.नि.गणेश वारुळे नियंत्रण कक्ष ते वाचक कार्यालय, शिर्डी विभाग, अकार्यकारी पद,
स.पो.नि.विवेक पवार टी.एम.सी. अहमदनगर ते वाचक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय (अकार्यकारी पद), स.पो.नि. संदिप हजारे शिर्डी पोलीस स्टेशन ते वाहतूक नियंत्रण शाखा शिर्डी (अकार्यकारी पद), स.पो.नि. कल्पेश दाभाडे नियंत्रण कक्ष अहमदनगर ते वाचक कार्यालय संगमनेर उपविभाग (अकार्यकारी पद),
महिला पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मोरे भिंगार कॅम्प ते लोणी, उप निरीक्षक योगेश शिंदे लोणी ते भिंगार कॅम्प, उप निरीक्षक तुळशिराम पवार नियंत्रण कक्ष ते बेलवंडी, उप निरीक्षक प्रियांका आठरे ए. एच. टी.यु. अहमदनगर ते भरोसा असेल अकार्यकारी पद, उप निरीक्षक निवांत जाधव नक्षल सेल अहमदनगर ते व्हीआयपी प्रोटोकॉल शनि शिंगणापूर मंदिर (अकार्यकारी पद),
उप निरीक्षक उमेश पतंगे नियंत्रण कक्ष ते टीएमसी अहमदनगर, उप निरीक्षक गजेंद्र इंगळे नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशातील ते वाचक उपअधीक्षक कार्यालय अहमदनगर शहर विभाग, उप निरीक्षक दिपक पाठक सध्याचे नेमणुकीचे ठिकाण नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन नविन नेमणुकीचे ठिकाण वाचक, उविपोअ., कार्यालय शेवगांव उपविभाग (अकार्यकारी पद),
उप निरीक्षक सतिश डौले नाशिक ग्रामीण येथुन बदली आदेशाधिन – ते वाचक, उविपोअ कार्यालय श्रीरामपुर उपविभाग (अकार्यकारी पद), उप निरीक्षक योगेश चाहेर नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन ते सायबर पोलिस ठाणे (अकार्यकारी पद) अशा बदल्या, नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
तसेच स.पो.नि. विवेक पवार, वाचक, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी पुढील आदेश होईपावेतो प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा, अहमदनगर या पदाचा अतिरीक्त कार्यभार पहावा. उप निरीक्षक उमेश पतंगे यांनी प्रभारी अधिकारी बीडीडीएस, उप निरीक्षक महेश शिंदे यांनी प्रभारी अधिकारी, नक्षल सेल, अहमदनगर या पदाचा अतिरीक्त कार्यभार पहावा असेही या आदेशात म्हंटले आहे.
या सर्व पोलीस अधिकारी यांनी पदग्रहण अवधी न उपभोगता तात्काळ बदली केलेल्या ठिकाणी हजर होऊन हजर झालेबाबत, तसेच प्रभारी अधिकारी यांनी कार्यभार हस्तांतर बाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा. हजर न झाल्यास शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही पोलिस अधिक्षक ओला यांनी दिला आहे