Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पतसंस्थेमधील घोटाळे समोर येत आहे. ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक होत आहे. आता अहमदनगरमधून आणखी एका संस्थेबाबत वेउत्त आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका मोठ्या ठिकाणी एका कॉम्प्लेक्समध्ये मागील काही वर्षापासून एक नामांकित संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारून मुदत ठेवीवर द.सा.द.शे. बारा ते तेरा टक्के व्याज देत असे. या बँकेमध्ये अनेकांनी ठेवी ठेवलेल्या होत्या. यामध्ये एका महिलेने जवळपास साडेतीन लाख रुपयांची मुदत ठेव पावती केली होती.
संबंधित पावतीची मुदत डिसेंबर २०२३ मध्ये संपली. गेल्या सहा महिन्यांमध्ये संबंधित पावतीची मुद्दल आणि होणारे व्याज याची वारंवार मागणी संबंधीत संस्थेच्या संचालककडे त्यांनी केली. परंतु घरातील पत्नी व आई आदी घरातील महिलांना पुढे घालून शिवीगाळ करणे धमक्या देणे, तुमचे पैसे मी देणार नाही तुम्हाला माझ काय वाकडे करायचे ते करा, अशी उद्धट भाषा वापरणे उद्योग सुरू होते.
अखेर १५ मे २०२४ रोजी सदर महिलेची सहनशीलताही संपली. त्या संबंधित ठेवीदार महिला तिची मुलगी आणि नातेवाईक संस्थेच्या कार्यालयामध्ये गेल्या. यावेळी संचालक हमरी तुमरी वर आले व तुमचे पैसे मी देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशी उद्धट भाषा त्यांनी त्याठिकाणी गेली.
संबंधित महिलेने मला आजारपणासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रकरण वाढत गेले. हा सर्व प्रकार भरचौकात सुरु होता. अखेर त्या ठेवीदार महिलेच्या मुलीने संचालकाच्या श्रीमुखात भडकवली. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती अशी माहिती समजली होती. या झटापटीमध्ये आरोपीच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याचेही समजते.
सध्या अहमदनगरमधील अनेक पतसंस्थेतील काही घोटाळे समोर आले आहेत. अनेक ठेवीदार जास्त व्याजाच्या आमिषाने पैसे ठेवतात पण आता त्यांच्यावर पस्तावण्याची वेळ आली आहे.