अहमदनगर बातम्या

कुकडी, घोड कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी ! कशा पद्धतीने होणार कामे? पहा..

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाला कुकडी व घोड सिंचन व्यवस्था वरदान ठरली आहे. या सिंचन व्यवस्थेच्या कालवा चाऱ्यांमधून अनेक हेक्टरची तहान भागली जाते.

दरम्यान कुकडी व घोड सिंचन व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी अनेकदा शेतकऱ्यांतून मागणी होत होती. आता ही सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्प योजनेंतर्गत सुमारे ३०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

या निधीतून कालवा चाऱ्यांना आवश्यक ठिकाणी लायनिंग व गेट दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे कालवा व चाऱ्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे.जलसंपदा विभागाने राज्यातील कालवे, मुख्य वितरिका, उपवितरिका देखभालीकडे १० वर्षांपासून दुर्लक्ष केले.

त्यामुळे कालवे वितरिकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी कुकडी घोड कालव्याची घटलेली वहन क्षमता आणि याचा आवर्तन व पाणी वाया जाणे,

याचा अभ्यास करून कालवा वितरिका लायनिंग व गेट दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. शासनाने नाबार्डच्या अर्थ साहाय्यातून कुकडी व घोड कालवा लायनिंगसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंचन आणि मलमपट्टी कुकडी प्रकल्प सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी शासन कोट्यावधी खर्च करून केवळ मलमपट्टी करीत आहे. डिंबे, माणिकडोह बोगदा प्रकल्पामुळे तीन टीएमसी पाण्याची तूट भरूर निघणार आहे.

तीन टीएमसी पाणीसाठा असलेले धरण तयार करण्यासाठी किमान ३ हजार कोटी लागतात. डिंबे माणिकडोह बोगद्यास ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts