Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता महाराष्ट्रातील बहुचर्चित समृद्धी महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जातो.
नुकतेच या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अर्थातच नागपूर ते शिर्डी अनावरण झाले असून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचे लोकार्पण खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल आहे. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात लवकरच ग्रीनफिल्ड विमानतळ तयार होणार आहे.
निश्चितच यामुळे जिल्ह्यातील शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. खरं पाहता भारतातील सर्वाधिक नागरी विमानतळ आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र नंतर गुजरात आणि उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. महाराष्ट्रीयन म्हणून हे निश्चितच आपल्यासाठी गर्वास्पद बाब आहे. दरम्यान आता महाराष्ट्रात तीन नवीन ग्रीनफिल्ड विमानतळाची निर्मिती होणार आहे.
यापैकी एक ग्रीनफिल्ड विमानतळ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात अर्थातच अहमदनगर मध्ये होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात नवी मुंबई, अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात शिर्डी आणि कोकणातील सिंधुदुर्ग मध्ये प्रत्येकी एक असे एकूण तीन ग्रीनफिल्ड एअरपोर्ट विकसित केले जाणार आहेत. यासाठी केंद्राकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय नागरिक उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकूण 14 नागरी विमानतळे आहेत. या ठिकाणाहून नागरी उड्डाणे संचालित होत आहेत. सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश मध्ये आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 13 विमानतळ आहेत. पश्चिम बंगालमध्ये मात्र पाचच नागरिक विमानतळे आहेत. कर्नाटक राज्यात नऊ आणि तामिळनाडू मध्ये सहा आहेत. तसेच राजस्थान मधून सात शहरांमधून नागरी उड्डाणे संचालित होतात.
आतापर्यंत देशात एकूण 146 कार्यरत विमानतळे आहेत. यापैकी 135 विमानतळ दोन वॉटर एरोड्रॉम, तसेच नऊ हेलीपोर्ट आहेत. आता ग्रीनफिल्ड विमानतळ धोरणांतर्गत सरकारने देशभरात 21 ग्रीनफिल्ड एअरपोर्ट उभारनीसाठी मंजुरी दिली आहे.
यापैकी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, शिर्डी आणि नवी मुंबई तसेच गोव्यातील मौका या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या ग्रीनफिल्ड एअरपोर्टला तत्वतः मान्यता मिळाली आहे. निश्चितच महाराष्ट्रात नव्याने तीन ग्रीनफिल्ड एअरपोर्ट विकसित केले जाणार असल्याने महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.