Ahmednagar News : सध्या पाऊस सर्वत्र सुरु असून त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर होत आहे. आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड तेजीमध्ये आलेत.
सध्या भाजीच्या फोडणीत वापरला जाणारा लसणाच्या भावात वाढ झालेली आहे. तर टोमॅटोची अगदी शंभरी गाठली आहे.
येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजारसमितीत शनिवारी १७०३.६७ क्विंटल पालेभाज्यांची आवक झाली. यामध्ये बटाट्याची सर्वाधिक आवक आहे. कोबी, टोमॅटो, घेवडा, गवार, वाल, दोडके, अद्रक, करटुले, हिरवी मिरची, बटाटे, शेवगा आदी भाज्यांची आवक झालेली आहे.
मागणी पेक्षा आवक कमी असल्याने सगळ्याचे भाजीपाल्याचे दर वाढलेले आहे. लसणाला सर्वाधिक भाव २२ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला.यामध्ये बटाट्याची सर्वाधिक ४६५.१६ क्विंटल आवक झाली.
बटाट्याला जास्तीत जास्त ३४०० रुपयांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. पालेभाज्यात सध्या शेपू, करडी आदी भाज्यांची आवक कमी झालेली आहे. मेथी व कोथिंबिरीची आवक चांगली असली तरी भावात तेजी कायम आहे.
पालेभाज्यांचे भाव
टोमॅटो : १००० ते १००००
गवार : ३००० ते ११०००
दोडका : २००० ते ७०००
वाल : ४००० ते ८०००
घेवडा : ९००० ते ११०००
लसूण: ५५०० ते २२०००
शेवगा : ५००० ते १२०००
भुईमूग शेंगा : ४५०० ते ६०००
अद्रक : ३५०० ते ११०००
करटुले : १०००० ते १००००
आवक घटल्याने तेजी
सध्या पाऊस सर्वत्र सुरु असून त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर होत आहे. आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड तेजीमध्ये आले आहेत. त्यामुळे सध्या गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अनेक ठिकाणी आता कडधान्यांना पसंती दिली जात आहे.