अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : उष्णता वाढली, पाणवठे आटले ! टंचाई तीव्र, टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. जसजशी उष्ण वाढतेय तसतशा पाणी टंचाईच्या झळा वाढत चाललेल्या दिसतायेत.

त्यामुळे केवळ गावांमध्येच नव्हे तर नगरपालिका क्षेत्रातही टँकर धावू लागले आहेत. पाण्याची मागणी वाढल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली आहे.

गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० टँकरची भर पडली असून सद्य:स्थितीत टँकरची संख्या २३७ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक ८७ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार केला जातो.

यंदा ८४ कोटी ४५ लाख रुपयांच्या जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिलेली आहे. यात पाण्याच्या टँकरच्या खर्चासाठी ८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या आराखड्यात १ हजार १८५ गावांत आणि ३ हजार ८८६ वाड्या वस्त्यांवर पुढील जून २०२४ पर्यंत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता ग्रुहीत धरण्यात आली आहे.

दरम्यान, उन्हाळ्याचे अडीच महिने सरले आहेत. यातच टँकरची संख्या २३७ वर पोहोचली आहे. मार्चच्या प्रारंभी साधारण टँकर सुरू झाले. १९ मार्चला जिल्ह्यात ५३ टँकर सुरू होतो. तेथून पुढे झपाट्याने टँकरची संख्या वाढली. १३ एप्रिलला १५८, १९ एप्रिलला २१०, तर आता २३७ वर टँकरचा आकडा पोहोचला आहे.

पुढील मे महिन्यात आणखी उष्णता वाढण्याची शक्‍यता असल्याने टँकरचा आकडाही झपाट्याने वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. सद्यस्थितीला जर पाहिले तर जिल्ह्यात २२७ गावे व १२५२ वाडी वस्तीवरील ४ लाख ७३ हजार लोकांना २३७ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यात सर्वाधिक ८७ टँकर पाथर्डी तालुख्यात सुरू आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts