अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश भागात बरसला, पण पाणलोटात रुसला ! धरणांत पाणीसाठा नाहीच..

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. राहुरी, कर्जत , जामखेड, नगर तालुक्यासह अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊसही झाला.

दरम्यान असे असले तरी पाणलोट क्षेत्रात अद्यापही म्हणावा तितका पाऊस पडलेला नाही. त्यामुळे म्हणावी तितकी आवक धरणात होत नाहीये. धरण साठ्यात मान्सून हंगामात अडीच टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झालेली पाहायला मिळाली.

मुळाच्या पाणलोट क्षेत्रावर मागील आठवड्यात पावसाने कृपादृष्टी दर्शविली. आषाढी सरी कोसळत असल्याने धरण साठ्यात कमी जास्त प्रमाणात पाण्याची आवक होऊन निच्चांकी अवस्थेत पोहोचलेला साठा वाढतानाचे चित्र आहे.

सोमवारी (दि.१५) रोजी पावसाने राहुरी परिसरात यथेच्छ झोडपून काढले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. १६) रोजीदिवसभर पावसाचा धो धो वर्षाव सुरूच होता.

परंतु पाणलोटात थांबा घेतलेल्या पावसामुळे आवक घटली. मुळाच्या बॅक वॉटरमध्ये लहित खुर्द येथील मुळा सरिता केवळ १ हजार ६१ क्यूसेक इतक्याच वेगाने पाणी जमा होत होते. अत्यल्प आवक असल्याने पाणलोटावर पावसाची कृपादृष्टी गरजेची आहे.

धरण साठा ८ हजार ४७० दलघफू इतका झाला आहे.हीच स्थिती थोड्याफार फरकाने भंडारदरा धरणाचीही आहे. सध्या पाणलोटात पाऊस होण्याची गरज आहे. त्यामुळे धारण साठे वाढतील. जिल्ह्याला वरदान ठरणारे मुळा, भंडारदरा धरणे भरतील.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा
भंडारदरा ४४९३ दलघफू, निळवंडे १४९० दलघफू, मुळा ८०९९ दलघफू पाणी आहे. त्याच बरोबर आढळा ४८७, मांडओहोळ २९.९७, घोड १४०१, सीना ३०३, खैरी १०३, विसापूर १८३, मुसळवाडी ३८.६३ तर टाकळीभान १५.६० दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts