मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर घेऊन येणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा विकास करताना सर्वच घटकांना न्याय दिला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा त्या त्या समाजाला लाभ मिळवून मिळवून दिला आहे.
यामध्ये दलित आणि अल्पसंख्यांक समाजाचाही मोठा फायदा झाला असून विकासाबरोबरच सर्वच समाजघटकांचे हित साधणाऱ्या आ. काळे यांना साथ देण्यासाठी दलित आणि अल्पसंख्यांक समाज त्यांच्या पाठीशी राहाणार असल्याचे नगदवाडी तसेच वेस सोयगाव येथील दलित आणि अल्पसंख्यांक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
नगदवाडी (सोनेवाडी) व वेस सोयगाव येथील अल्पसंख्यांक समाज व दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी नुकताच आ. काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी या कार्यकत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले की, आमदार काळे यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या मस्जिद तसेच दफन भूमीच्या विकासासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावाला भरीव निधी दिला.
एवढा निधी आजपर्यंत कुणीच दिला नाही. ज्या ज्या वेळी अल्पसंख्यांक समाजाने आमदार काळे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या. त्या अडचणी आ. काळे यांनी तात्काळ सोडविल्या असल्याचे अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले.
तसेच दलित समाज बांधवांनी सांगितले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कोपरगाव शहरातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळप्रसंगी स्वतः बाजूला राहून अनावरण करण्यासाठी प्रयत्न करणारे आ. काळे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे वारसदार आहेत.
यावेळी आ. काळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.यावेळी वेस-सोयगाव येथील शाहरुख सय्यद, इमाम सव्यद, लाला सय्यद, सलमान सय्यद, मुन्ना शेख, अब्दुल शेख, अल्ताफ शेख, अस्लम शेख, मुज्जाहिद सय्यद, अरबाज शेख, अल्ताफ सय्यद, जैनुद्दीन सय्यद, राजेंद्र माळी, सोमनाथ सोनवणे, रामदास गांगुर्डे, संजय माळी, गोरख माळी, पप्पू खंडिझोड, सचिन भालेराव, रामनाथ खंडिझोड
शरद पवार तसेच नगदवाडी (सोनेवाडी) येथील शब्बीर शेख, हकीम शेख, नानासाहेब बत्तासे, नामदेव साळवे, मंगेश साळवे, संदीप साळवे, महेश साळवे, बबन साळवे, ज्ञानेश्वर साळवे, भाऊराव साळवे, किसन साळवे, छबुराव साळवे, गणेश साळवे, देविदास साळवे, रोहिदास साळवे, मारुतीराव साळवे, किरण साळवे, नारायण साळवे, विठ्ठल साळवे, सूर्यभान साळवे, जगन साळवे, नरेश साळवे, प्रशांत साळवे, शरद त्रिभुवन, समीर साळवे, राजु शेख आदींनी प्रवेश केला.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.