Ahmednagar News : आधी आमदार त्यानंतर खासदार झालेले निलेश लंके हे नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व. राजकीय असो की कोणतेही क्षेत्र त्यांची क्रेझ कायम राहिली.
खरतर निलेश लंके यांची निवडणूक गाजली त्यापेक्षा गाजले त्यांचे खासदार झाल्यानंतर केलेलं दोन आंदोलने. एक म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेले दूध व कांदा भाववाढीचे आंदोलन.
दुसरे म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केलेले एलसीबी विरोधातील आंदोलन. परंतु सध्या दुसऱ्या आंदोलनाची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झालीये. त्याच कारण असं या आंदोलनानंतर काही दिवस अवैध धंद्यांविरोधात मोहिमा निघाल्या,
मात्र आता या मोहिमांबरोबच खा. लंके देखील थंडावले असल्याची चर्चा सुरु झाली. जिल्हा पोलीस दलाच्या विरोधात खा. नीलेश लंके यांनी जोरदार मोहीम उघडली होती.
विशेषतः स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करून पोलीस कारभाराचे वाभाडे काढले होते. जिल्ह्यातील अवैध धंदे, त्यातून मिळणारी कमाई, हप्त्यापोटी मिळणारी रक्कम याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली होती.
त्यावेळी खा. लंके यांच्या मागण्यांबाबत नाशिक परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी लेखी आश्वासन दिले व त्यानंतर ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलन मागे घेतले गेले.
परंतु या हे आंदोलन होऊन आता महिना उलटला आहे. या आंदोलनाबाबत आता नागरिक खुसफूस करू लागलेत. पोलीस महानिरीक्षक यांनी जे पत्र दिल होत त्या पत्राप्रमाणे खरोखर कार्यवाही झाली का? अवैध धंदे बंद झाले का, आक्षेप घेतलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या का?
याची चर्चा आता नागरिक करायला लागलेत. अवैध धंद्याविरुद्ध सुरू केलेली मोहीम अचानक थांबल्यासारखी वाटते असेही म्हटले जाऊ लागलेय.
विशेष म्हणजे खा. लंके यांनी सर्वाधिक आक्षेप घेतलेल्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली तर अद्यापही झालेली नाही व खा. लंके मात्र शांत झालेत त्यामुळे नागरिक अनेक तर्कवितर्क काढत आहेत.