अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, फळबागांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेने आता चढता पाय घेतला आहे. उष्णेतेचा पार दिवसेंदिवस वाढत असून सध्या तापमान ३९ अंशावर गेले आहेत. एकीकडे उष्णता व दुसरीकडे आभाळ येत असल्याने अवकाळीचा संकट उभे ठाकले आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून अवकाळीचे चिन्ह तयार झाले आहेत. काही तालुक्यात वादळी वाऱ्याने हजेरी लावली आहे. पाऊस जरी नसला तरी वादळ मोठे नुकसान करत आहे.

नगर तालुक्यातील काही भागाला दोन दिवसांपूर्वी वादळाचा तडाखा बसला होता. आता पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. तालुक्यातील फुंदे टाकळी, कोळसांगवी, पिंपळ गव्हाण, येळी या पट्ट्यात सर्वाधिक नुकसान झाले.

सर्वाधिक नुकसान आंबा, संत्री व भाजीपाल्याचे झाले. पावसाचे प्रमाण कमी असल्याने अन्य हानी टळली. झाडे पडणे, विजांच्या तारा तुटणे, याप्रकाराने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा काही काळ खंडित झाला. राष्ट्रीय महामार्गावर वाहने सुरक्षित स्थळी थांबून वादळ थांबण्याची वाट वाहनचालक बघत होते.

वातावरणातील वाढते तापमान
मंगळवारी दुपारनंतर वातावरणात प्रचंड उकाडा वाढून तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले. उन्हाच्या तीव्रतुळे शहरासह ग्रामीण भागात दुपारी १२ नंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वत्र सामसूम होती. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी उसाचा रस, थंड पेये पिण्यासाठी गर्दी केली होती.

दरम्यान उद्या अहमदनगर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच अहमदनगरचे तापमान पुढील काही दिवसांत ४१ अंशावर जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नगर तालुक्यातही काही भागात वादळाचा तडाखा
दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यातही अवकाळीचा तडाखा बसला होता. अनेक भागात फळबागांचे नुकसान झाले. कांदा उत्पदक शेतकरी मात्र याने धास्तावला आहे. कांदा काढणीसाठी, काढलेला कांदा झाकवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts