अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : बायकोवर अत्याचार करून लहान मुलांना ठार मारलय..! ‘तो’ घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांत आला, पण त्यानंतर..

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव लाटे वस्ती येथील एका व्यक्तीने माझ्या बायकोवर अत्याचार करून मुलांना ठार मारले अशी खोटी माहिती पोलिसांना दिली. त्याच्यावर विश्वास ठेवून पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.

नंतर सदर व्यक्तीच्या पत्नीविषयी माहिती घेतली असता ती संगमनेर येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. सदर व्यक्तीने याआगोदरही अनेक वेळा खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले. शेवटी त्या व्यक्तीच्या आईने संपूर्ण पोलीस प्रशासनाची माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

दि. ८ जून रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास निपाणी वडगाव परिसरातील लाटे वस्ती येथील रमेश कारभारी राऊत (वय ४२) हा घाबरलेल्या अवस्थेत अशोकनगर पोलीस चौकी येथे आला. त्याठिकाणी गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई उपस्थित होते. रमेश राऊत याने घटनेचे इतिवृत्त देसाई यांना सांगितले.

राजेंद्र देसाई यांनी राऊत यास तू खोटे बोलतो. तू नेहमी खोटी माहिती देतो, तू नेहमी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे देसाई यांनी राऊत यास सांगून घरी जाण्यास सांगितले.

काही वेळाने राऊत याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन घटनेची खोटी माहिती दिली. सदर माहिती ऐकून ठाणे अंमलदारांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना सदर इसमाबाबत माहिती देऊन घटनेचे गांभीर्य सांगितले. त्यामुळे नितीन देशमुख यांनी पोलीस पोलीस तपास यंत्रणा घेऊन अशोकनगर हद्दीतील लाटे वस्ती याठिकाणी जाण्यास सांगितले.

पोलिसांनी सदर ठिकाणी जावून लगतच्या परिसरातील शेतामध्ये शोध घेतला असता त्यांना काहीही आढळून आले नाही. यावरून सोळुंके यांनी सदर इसमास ताब्यात घेऊन खरी माहिती देण्यास भाग पाडले. यावेळीही रमेश राऊत याने माझ्या बायकोवर सात ते आठ व्यक्तींनी अत्याचार करून मुलांबाळासह जीवे ठार मारले आहे, अशी माहिती दिली.

पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे सखोल चौकशी केली असता तक्रारदार रमेश राऊत याची पत्नी शितल संगमनेर येथे असल्याची माहिती समोर आली. रमेश राऊत हा खोटी माहिती देत असल्याचे पोलीस नियंत्रणेकडून सिद्ध झाले. यावेळी रमेश राऊत याची आई जाईबाई राऊत यांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यानंतर यावर पडदा पडला असल्याचे समजते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts