अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील ‘या’ प्रसिद्ध देवस्थान अध्यक्षांना धमक्या ! ताबेमारीचा प्रयत्न होतोय?

Ahmednagar News : अहमदनगरमधील देवस्थानचा अध्यक्षांना व इतर पदाधिकाऱ्यांस धमक्या येत असल्याची माहिती समजली आहे. नेवासे येथील श्रीनवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट याबाबत संबंधित हा प्रकार आहे.

या नाथपंथी अध्यत्मिक कार्य करणाऱ्या ट्रस्टच्या अध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांना धमक्या येत आहेत. न्यासाच्या जमिनीवर कुपन, मशागतीचे काम सुरु असताना संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री फोडकर आणि इतर पदाधिकाऱ्यांना भीमा शिंदे नावाच्या इसमाकडून धमक्या येत आहेत.

नाथपंथी सिद्धयोगी सद्गुरू श्रीदेवेंद्रनाथ महाराज यांच्या भाग्यश्री फोडकर या कन्या आहेत. याबाबत सुत्रांनी सांगितले, संस्थेच्या मालकीची बहिरवाडी, ता. नेवासा येथे सुमारे साडेआठ एकर जमीन आहे.

त्यावर कुंपण घालण्याचे काम संस्थेने ८ ऑगस्टपासून सुरु केले. त्यासाठी रितसर पोलीस संरक्षण मागण्यात आले. भीमा शिंदे याच्याशी काही वर्षांपूर्वी संस्थेचा या जमिनीबाबत व्यवहार झाला. मात्र, तो पूर्ण झाला नाही.

धर्मदाय आयुक्तांच्या आदेशात भीमा शिंदे याचे संस्थेने घेतलेले १० लाख रुपये व्याजासह परत देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शिंदे याला व्याजासह पैसे परत देण्यात आले.

त्याने ते स्वीकारून व्यवहार संपवला. त्यांनतर संस्थेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मात्र त्यांनतर जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला नाही म्हणून मनात राग ठेवून तो संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी त्रास देत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

संस्थेच्या मालकीच्या जमिनीची मशागत करण्यास अथवा मोजणी व इतर गोष्टीसाठी कोर्टाचे मनाई आदेश नाहीत. जमिनीचा उतारा हा संस्थेच्या नावे आहे. बहिरवाडी येथे कुंपण घालण्यासाठी पोलीस संरक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रांत यांनी लेखी कळविले.

शिंदे हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या बहिरवाडी जमिनीत पाऊल ठेवले तर दहशत निर्माण करत आहे. कुंपण करायचे काम सुरु असताना पोलिसांना धक्काबुक्की केल्याबाबत शिवा शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts