अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : मांड ओहोळ धरणात दोन विद्यार्थी बुडाले ! मित्र सोबत फिरायला गेले अन दुर्घटना घडली

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मांडओहोळ धरणात पाण्याची खोली लक्षात न आल्याने बुडून दोन तरुणांचा पाण्यात मृत्यू झाला आहे. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १७), सौरभ नरेश मच्चा (वय १७, दोघेही रा. शिवाजीनगर, अहमदनगर) अशी मी मृतांची नावे आहेत.

पारनेर तालुक्यातील मांड ओहोळ जलाशयात रविवारी (दि. १९) दुपारी दोन तरुण बुडाले. दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, तर दुसऱ्याचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. नगर शहरातील कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर भागातील सहा मुले दुचाकीवरून मांड ओहोळ जलाशयात गेले होते.

अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १८, रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रस्ता, अहमदनगर) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. तथापि, सौरभ नरेश मच्छा (१८, रा. अहमदनगर) याला अद्याप पाण्याबाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्याचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी चैतन्य बालाजी सापा (वय १९, शिवाजीनगर, अहमदनगर), आकाश अनिल हुंदाडे (१८), जीवन दिनेश पाटील (रा. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा, अहमदनगर), अभिलाष रघुनाथ सुरम (१८) हे सहाजण दुचाकीवरून निघोज येथून मांड ओहोळ जलाशयात पोहोचले.

दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अथर्व श्रीराम, सौरभ मच्छा पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्यानंतर इतर मित्रांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक आले. तसेच ही माहिती समजल्यावर सरपंच प्रकाश गाजरे व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले.

त्यांनी अथर्व श्रीरामला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सौरभ मच्छा हा पाण्यातच असून, त्याला अद्याप पाण्याच्या बाहेर काढण्यात आले नाही. सायंकाळपर्यंत त्याचा शोध सुरू होता.

त्याचा शोध घेण्यासाठी नगर येथून त्यासाठी स्वतंत्र पथक येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. विद्यालयांना उन्हाळी सुट्या असल्याने सध्या पर्यटनस्थळावर सगळीकडेच गर्दी पहावयास मिळत आहे.

ही मुले देखील पर्यटनासाठीच इकडे आली होती. मात्र जेमतेम पोहता येत असताना ते पाण्यात उतरले अशी माहिती देत तरुणांनी जास्त पाण्यात उतरू नये असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी मीडियाशी बोलताना केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts