अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अंब्रेला धबधबा पुन्हा सुरू

Ahmednagar News : भंडारदरा पर्यटनस्थळापैकी प्रसिद्ध असलेल्या अंब्रेला धबधब्यामधून शनिवारी दुपारी पाणी सोडण्यात आले असून अंबेला धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या अंब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्याची मागणी शेंडी येथील नागरीकांसह इतर पर्यटकांनी मागणी केली होती.या शनिवारी व रविवारी तरी अंब्रेला धबधब्याचे दर्शन होणार असून त्यामुळे विकएंडच्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना अंब्रेलाच्या विहंगम दृश्यांचा नजारा बघावयास मिळणार आहे.

भंडारदरा धरण शाखेनी यासंदर्भात संपर्क साधला असता भंडारदरा धरणामध्ये होणारी पाण्याची आवक व वरिष्ठांच्या आदेशानुसार अंब्रेला धबधब्यातून २१८ क्युसेसने विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहीती उपलब्ध होत आहे.

तुर्त जरी भंडारदरा धरणाच्या अंब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी हा धबधबा प्रत्येक शनिवार व रविवार सुरु करण्यात यावा, अशी मागणी शेंडी गावच्या नागरिकांची आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये पावसाचे प्रमाण जरी जेमतेम असले तरी शनिवारी संध्याकाळी मात्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गत २४ तासात भंडारदरा येथे २९ मीमी पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे ७२ मीमी पाऊस पडला.

पांजरे येथे ४३ मीमी, रतनवाडी ७९ मीमी तर वाकी येथे १७ मीमी पावसाची नोंद झाली. ११०३९ दलघफु क्षमता असणारे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून ६०९ व वजनिर्माण केंद्रातून ८२० क्युसेसने पाणी प्रवरा नदीमध्ये सोडले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts