Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर परीसरात (दि.२९) दुपारी चार वाजता अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे गहु, कांदा, उन्हाळी बाजरी, ऊस तसेच फळबागमध्ये चिंच,
संत्रा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊसासोबत वारा खूप होता. काही शेतामध्ये शेतकऱ्यांची गहू काढणी चालू आहे. तसेच शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. त्यातच पाऊस झाल्याने कांदा सरीत पाणी साचले आहे.
काही ठिकाणी आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या वाऱ्यामुळे खाली पडल्या. शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस अजुन शेतात आहे. अशा अवकाळी पाऊस आल्याने काळ्या जमीनीत पाणी साचून राहते.
यामुळे ऊस टायर, टॅक्टर, ऊस तोडणी मशिन, ऊस तोड मजुर शेतात जात नाही. यामुळेच अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे.