Ahmednagar News : अहमदनगर दक्षिणेचे राजकारण तापले, प्रचार शिगेला गेला आणि आज मतदान झाले की हे वादळ शांत होईल. पण यात महत्वाचा प्रश्न बाजूला पडताना दिसला.
दक्षिणेतील विशेषतः श्रीगोंदे तालुक्यातील अनेक गावांत पाणीप्रश्न बिकट असताना नेते, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत दंग असल्याने हा प्रश्न अडगळीत पडला की काय अशी चर्चा सुरु झालीये.
कुकडीच्या येडगाव धरणात ४०० दशलक्षघनफूट उपयुक्त पाणी असले तरी त्यात आवर्तन होऊ शकत नाही. पण याकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने थोडे समाधान आहे.
लोकसभा निवडणुकीत कुकडीच्या पाण्यात श्रीगोंदेकरांवर अन्याय होतोय हा मुद्दा चर्चिला गेला, मात्र त्यावर ठोस उपायांबाबत कुणी बोलले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुकडीखालील नेते, कार्यकर्त्यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला नाही.
आपल्या उमेदवारांची पोस्ट फिरविणारे कार्यकर्ते आता दोन दिवसांनी पिण्याच्या पाण्याबद्दल चर्चा करतील. दरम्यान कुकडीच्या डाव्या कालव्याला ज्या येडगाव धरणातून पाणी सोडले जाते तेथे केवळ ४०० दशलक्षघनफूट उपयुक्त पाणी आहे.
त्याचवेळी डिंभे धरणात दीड टीएमसी पाणी आहे. पिंपळगावजोगे धरणातून शेतीचे आवर्तन सुरुच आहे. ते आवर्तन अजून दोन दिवस चालेल असे समजते.
त्यानंतर पिंपळगावजोगेतील सव्वाचार टीएमसी असणारा अचल साठा काढण्याबाबत चर्चा सुरु होईल. त्यालाही सरकारी मंजुरी लागते. त्यामुळे कुकडीतून पिण्यासाठी पाणी सुटणार आहे का ? व सुटले तरी नेमके कधी याबाबत सर्व शक्यता धूसरच आहेत.
डिंभे ते माणिकडोह बोगदा हवाच..
कुकडीच्या फक्त डिंभे धरणात दीड टीएमसी उपयुक्त पाणी साठा आहे. इतर धरणातील उपयुक्त पाणी संपले आहे. येडगावमध्ये जे पाणी दिसते तेही डिंभेतूनच आलेले आहे. त्यामुळे डिंभे ते माणिकडोह हा राजकीय चर्चेत राहिलेला बोगदा असता तर आता उपयोग झाला असता