Ahmednagar News : पतीने पत्नीस विष पाजून संपवल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीने क्रूरतेचा कळस गाठला. ही घटना रविवारी (दि. ११) श्रीगोंदा शहरानजीक घडली.
खून करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बापू झुंबर दातीर याला श्रीगोंदे पोलिसांनी सुपा (ता. पारनेर) येथे डोंगरात पाठलाग करून पकडले.
मृत संगीता बापू दातीर (वय ५०, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) यांनी पती बापू झुंबर दातीर (रा. सप्रेवाडी, ता. श्रीगोंदा) याला बाहेरील महिलेशी संबंध ठेवू नयेत असे समजावून सांगितले होते. मात्र, या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने तिला मारहाण करत विषारी औषध पाजले होते.
गंभीर अवस्थेत असलेल्या संगीता यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. श्रीगोंदे पोलिस या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम तपास करत होते. सोमवारी (दि. १२) दुपारी खबऱ्याकडून आरोपीचा शोध घेतला असता
आरोपीस सुपा परिसरातील डोंगरात पाठलाग करून पकडण्यात आले. आरोपी नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीस पकडण्यात पोलिस हवालदार मुकेश बडे, गोकुळ इंगवले, आनंद मैड, शरद चोभे, संभाजी गर्जे यांनी परिश्रम घेतले.