अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- सोशल मीडियाचा उपयोग विधायक कामासाठी केल्यास निश्चित त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात हे अनेकदा सिद्ध झाले आहेत.
नुकतीच एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियामुले अवघ्या काही तासातच शोध लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा परिसरातुन एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात लोकांनी अपहरण केले होते.
दरम्यान सदर मुलीला अपहरण करणाऱ्या व्यक्तीचे तसेच त्या गाडीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्यामुळे पोलीस तपासात गती आली.
सदर मुलगी पांगरी (जि. नाशिक) येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ संबंधित मुलीला ताब्यात घेऊन तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. पोलीस मित्र शांताराम वारुळे यांनी या कामी महत्त्वाची भूमिका पार पाडली.