अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात काल शनिवारी 600 रुपयांनी वाढ झाली भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले.(Ahmednagar Onion Rates )
कांदा आवकेत 9 हजार गोण्यांनी वाढ होऊनही भावात वाढ झाली. काल 208 वाहनांमधून 38 हजार 522 गोणी कांदा विक्रीसाठी आला होता.
उन्हाळी कांद्यामध्ये मोठ्या मालाला 3400 ते 3600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 3000 ते 3200 रुपये, मध्यम मालाला 2000 ते 2100 रुपये, गोल्टी कांद्याला 1900 ते 2100 रुपये, गोल्टा कांद्याला 1800 ते 2200 रुपये तर एक-दोन वक्कलला 3600 ते 3800 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कांद्याच्या नवीन मालाला 800 ते 3100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. या आठवड्यातील कांदा लिलावाच्या तीनही दिवशी आवक व भाव वाढते राहिले.
सोमवारी 18 हजार 376 गोण्या आवक होऊन भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले होते. बुधवारच्या मार्केटमध्ये 29 हजार 457 गोण्या आवक होऊन भाव 3200 रुपयांपर्यंत निघाले होते.
काल आठवड्यातील शेवटच्या दिवशी 38 हजार 422 गोण्या आवक होऊन भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले. आठवड्याच्या पहिल्या दिवसापेक्षा शेवटच्या दिवशीच्या जास्तीत जास्त भावात 800 रुपयांची वाढ झाली तर आवकही सोमवारच्या तुलनेत शनिवारी दुपटीहून अधिक झाली.