अहमदनगर उत्तर

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची आज पोटनिवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. साखर कारखाना, बँक निवडणूक पाठोपाठ आता ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक होत आहे.(By-election )

यातच राहाता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये हसनापूर, गोगलगाव व लोणी खुर्द या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

विविध कारणांनी रिक्त झालेल्या या जागांसाठी आज सकाळी 7.30 वाजेपासून मतदानास प्रारंभ होत आहे. हसनापूर व गोगलगाव येथे प्रत्येकी एका जागेसाठी एक एक मतदान केंद्र आहे तर लोणी खुर्द येथे एका प्रभागात 3600 मतदार असल्याने तेथे 4 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

असे तिन्ही गावांत एकूण सहा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. राहाता तालुक्यातील सात गावांच्या ग्रामपंचातीतील रिक्त जागांवर निवडणूक होऊ घातली होती.

त्यापैकी बाभळेश्वर, लोहगाव, नांदुर्खी बु., वाळकी येथील जागा बिनविरोध होत असल्याने उर्वरित हसनापूर, गोगलगाव, लोणी खुर्द येथे पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी आज मतदान होत आहे.

भरारी पथके सज्ज… सहा मतदान कर्मचार्‍यांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 5 कर्मचारी असे एकूण 30 कर्मचारी या तिन्ही गावांच्या पोटनिवडणुकीचे मतदान घेण्यासाठी सज्ज आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts