अहमदनगर उत्तर

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत 14 हजार गोण्याची घट

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांदा गोण्यांची आवक कमी झाल्याची दिसून येत आहे.

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याच्या आवकेत 14 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 24 हजार 347 गोण्या आवक होऊन भाव 3700 रुपयांपर्यंत निघाले.

जाणून घ्या कांद्याला मिळालेला दर :-

उन्हाळ कांद्याच्या मोठ्या मालाला 2800 ते 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मध्यम मोठ्या मालाला 2100 ते 2200 रुपये

मध्यम मालाला 1900 ते 2000 रुपये

गोल्टी कांद्याला 1200 ते 1700 रुपये

गोल्टा कांद्याला 1500 ते 1800 रुपये

जोड कांद्याला 300 ते 400 रुपये

एक-दोन वक्कलला 3500 ते 3700 रुपयांपर्यंत भाव मिळाला

नवीन मालाला 200 ते 2500 रुपयांपर्यंत भाव मिळाला

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Nevasa

Recent Posts