सरपंचांच्या मुदतवाढीसंदर्भात पालकमंत्री मुश्रीफ यांचे महत्वाचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेच्या सभागृहात मुश्रीफ यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी सरपंच पदाच्या मुदतवाढीसंदर्भात महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले,

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता डिसेंबरपर्यंत घेणे शक्य नाही़ तसेच मुदतवाढही देता येणार नाही़ याबाबत सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिले आहेत.

खासदार-आमदारांना जशी मुदतवाढ देता येत नाही, तशीच मुदतवाढ सरपंचांना देता येणार नाही़ त्यामुळे प्रशासक नेमण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenew

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts