Ahmednagar News : सध्या मद्यपान करणाऱ्यांचा आकडा वाढला आहे. थंडीत देखील हे प्रमाण वाढलेच दिसते. देशी, विदेशी, बिअर आदी पिणारे बहुसंख्य आहेत. समाजात नजर टाकली तर अगदी कमी वयाची मुले देखील मद्याच्या आहारी गेल्याचे दिसते.
हिवाळ्यात मद्य पिणे अनेकांना सुखावह वाटते. परंतु या मद्यामुळे हृदयाच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते असे तज्ञ म्हणतात. थंडीत जर तुम्ही मद्यपान करत असाल तर हृदयाची काळजी घ्यावी, त्रास जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.
दोनच तालुक्यांत लाखो लिटर दारू रिचवली
दारू पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या आकडेवारीवरूनच तुमच्या ते लक्षात येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव व राहाता तालुक्यात (लोणी पोलिस स्टेशन हद्द वगळून) एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या
आठ महिन्यात तब्बल देशी दारूची १४ लाख १४ हजार ९७ लिटर, विदेशी दारूची १० लाख ५१ हजार ६५७ लिटर तर बिअरची ६ लाख ५१ हजार ८० लिटर विक्री झाली.
अल्कोहोलचा हृदयावर काय परिणाम होतो?
अल्कोहोलचा हृदयावर थेट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. अल्कोहोलमुळे हृदयाची स्पंदने कमी होतात याशिवाय स्वादुपिंड देखील खराब होते. यामुळे डायबिटीस होऊ शकतो. हार्टअटॅक येऊ शकतो. नसा खराब होतात शिवाय अल्कोहोलमुळे किडनी,
हृदय, मेंदू व लिव्हरवर परिणाम होऊ शकतो असे तज्ञ डॉक्टर सांगतात. मद्यपान करणाऱ्यांना ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वर्षातून किमान एक वेळेस तरी तपासणी करून घ्यावी असे डॉक्टर सल्ला देतात.