विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये आमदारांनी कामाचा धडाका लावला असून काही कामांचे भूमिपूजन केले जात आहे तर काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण देखील केले जात आहे.
अगदी याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील रांजणगाव देशमुख येथे निळवंडे कालव्यातून विविध गावातील बंधारे तुडुंब भरले असून या बंधार्यांचे जलपूजन केले व अनेक कामांचे लोकार्पण देखील केले.
यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की,विकासाची गंगा अविरतपणे जर अशीच वाहती ठेवायचे असेल तर तुम्ही पाठीशी राहा विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील असा महत्वपूर्ण विश्वास त्यांनी दिला.
आ. आशुतोष काळे यांनी केले अनेक कामांच्या लोकार्पण
कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागातील गावे म्हणून ज्यांनी आजवर दुष्काळाच्या झळा सोसल्या, त्या गावांचा विकास तर केलाच, परंतु त्या गावातील कार्यकर्त्यांनी जो बंधारा सांगितला, तो बंधारा भरून देण्यासाठी स्वतः कालव्यावर कालवा निरीक्षकाप्रमाणे ठाण मांडून बसलो. त्यामुळे ही विकासाची गंगा अविरतपणे अशीच वाहती ठेवण्यासाठी तुम्ही पाठिशी राहा,
विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील, असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी दिला.आ.आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील रांजणगाव देशमुख येथे निळवंडे कालव्यातून विविध गावातील बंधारे तुडूंब भरले असून या बंधाऱ्याच्या पाण्याचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सोमवार (ता. २३) जलपूजन करण्यात आले. तसेच १ कोटी ३० लाख रुपये निधीतून रा.मा. ६५ खंडोबा मंदिर ते संदीप गोर्डे घर रस्ता, रांजणगाव देशमुख ते तालुका हद्द (चिंचोली) रस्ता, दलित वस्ती गावठाण ते वडझरी याभाऊ रस्ता,
सुनील वर्षे घर ते आत्याभाऊ वर्षे घर रस्ता, दशरथ खालकर घर ते श्री तुळजाभवानी मंदीर रस्ता आदी रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील सर्व भागातील नागरिक मला एक सारखेच आहेत.
त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने विकास करायचा पण कुणावर अन्याय करायचा नाही, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमचे पाणी तुम्हाला आणि त्यांचे पाणी त्यांना दिले आहे. जी रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना २०१९ पर्यंत बंद होती, ती योजना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमाणे पदरमोड करून पाचही वर्ष चालविली आणि ज्यावेळी निळवंडे कालव्याचे पाणी दुष्काळी भागाला द्यायचे ठरले त्यावेळी वितरिकांची व्यवस्था नसल्यामुळे आपल्या मतदार संघातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही.
यासाठी पाहिजे ती मदत केल्यामुळे आज आपण हा दिवस पाहतो आहे. रांजणगाव देशमुख येथे आशुतोष काळे यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना, तलाठी कार्यालय,
राज्य मार्ग ६५, सावळीविहीर रस्ता, वेस- रांजणगाव देशमुख-काकडी रस्ता तसेच प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते व विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होवून झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून या भागातील नागरीका विकासाची परतफेड मताधिक्यातून करतील अशी ग्वाही यावेळी उपस्थित नागरिकांनी दिली.