नेवासा

नेवासा तालुक्यातील अनेक गावांवरून रात्री ड्रोनच्या घिरट्या! लांडेवाडीत कोसळले ड्रोन; नेमके आहे कुणाचे? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News: गेल्या आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन गिरट्या घालताना दिसून आले व त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. नेवासा तालुक्यातील झापवाडी,भेंडा कुकाना, लोहगाव, सोनई, वडाळा, रस्तापूर, चांदा, तुकाई, शिंगवे इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी तीन ते चार ड्रोन फिरताना नागरिकांना दिसून आले होते व त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.

या भीतीपोटी या परिसरातील नागरिकांनी पोलिसांना देखील फोन केले. परंतु हे ड्रोन नेमके कुणाचे आहेत किंवा त्यांचा घिरट्या घालण्यामागील उद्देश काय आहे? याबाबत कुठल्याही प्रकारचे अधिकृत माहिती अजून पर्यंत तरी पोलिसांकडे नाही.

त्यातल्या त्यात नेवासा तालुक्यातील लांडेवाडी परिसरात रात्रीच्या वेळी तीन ते चार ड्रोन फिरत असताना त्यातील एक ड्रोन कोसळले व हे ड्रोन रात्री फिरणाऱ्या ड्रोन पैकीच एक असल्याचा संशय नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे याबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 नेवासा तालुक्यातील लांडेवाडी कोसळले ड्रोन, पण कुणाचे आहे? नागरिकांमध्ये प्रश्न

नेवासा तालुक्यातील लांडेवाडी परिसरात रात्रीच्यावेळी तीन ते चार ड्रोन घिरट्या घालत होते. शनिवारी (दि.५) रोजी साडेचारच्या सुमारास एक ड्रोन कोसळले. हे ड्रोन रात्री घिरट्या घालणाऱ्यांपैकी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे ड्रोन नेमके कोणाचे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू होत्या. त्याचवेळी नेवासा तालुक्यातील भेंडा कुकाणा, देवगाव, झापवाडी, लोहगाव, सोनई, कांगोणी, वडाळा, रस्तापूर, चांदा, तुकाई शिंगवे, ब-हाणपूर आदी ठिकाणी तीन ते चार ड्रोन फिरताना दिसत होते.

त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ड्रोनबाबत नेवासा, सोनई परिसरातून अनेक गावांमधून पोलिसांना फोन येत होते. परंतु, ड्रोनच्या घिरट्यांबाबत कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. ड्रोनद्वारे रेकी करून चोरी करण्याचा उद्देश नाही ना, असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात होते.

मात्र देवगाव ते भेंडा दरम्यान असलेल्या लांडेवाडी येथे एक ड्रोन पडलेले आढळून आले. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर लगेच कुकाणा दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांच्यासह पथक लांडेवाडी येथे दाखल झाले.

त्यांनी कोसळलेले ड्रोन ताब्यात घेतले. ते स्थानिक कोणाचे आहे का? याबाबत चौकशी केली. मात्र, त्याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही.याबाबतचा तपास पोलिस करत आहेत. या ड्रोनची माहिती मिळाल्यास पोलिसांना रात्रीचे ड्रोन नेमके कोण उडविते. याची माहिती मिळू शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts