नेवासा येथील मध्यमेश्वर व पुनतगाव बंधाऱ्यामध्ये निळवंडे धरणातुन पाणी भरून देण्याच्या मागणीसाठी नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, पुनतगाव, खुपटी, चिंचबन, साईनाथनगर ग्रामस्थांनी काल गुरूवारी (दि.१४) उपोषण केले.
नेवासा तालुक्यातील नदी काठावरील शेतकऱ्यांवर बंधारे भरुन देता, अन्याय होत असल्याने बंधारा बचाव कृती समीतीने काल गुरूवारी उपोषण सुरु केले होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय कल्हापुरे यांनी कार्यकारी अभियंता अहमदनगर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार बंधारे भरुन देण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नायब तहसीलदार सानप, ज्ञानेश्वर पेचे, अनिल ताके, सतिष गायके, राजेंद्र पोतदार, राजेंद्र कडु हे उपस्थित होते.
या उपोषणात बाळासाहेब कोकणे, राजेंद्र घोरपडे, अनिल बोरकर, संभाजी कार्ले, संजय गायके, सुनील व्यवहारे, लक्ष्मण जगताप, बाळासाहेब पाटील, नंदकुमार पाटील, दादासाहेब गंडाळ, विक्रम चौधरी, संभाजी पवार, प्रकाश सोनटक्के, संदीप बेळे, बाबू घोडेकर, बाळासाहेब मतकर, गफूर बागवान, अनिल ताके, गोद कुर , लक्ष्मण मिसाळ, अशोक देवडे, महेश लोखंडे, बदाम चौधरी, मोहन गवळी आदी सहभागी झाले होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा पाऊस कमी झाल्याने प्रवरा नदी वाहिली नसल्याने पिण्याचा पाण्याचा, चाऱ्याचा, पशुपक्षांचा पाणी प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने दिलेल्या सुचनेनुसार भंडारदरा निळवंडे धरणातुन प्रवरा नदीवरील संपूर्ण बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन देण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना देखील प्रवरा नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन दिले असून फक्त नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा व पुनतगाव बंधारा कार्यकारी अभियंता यांनी पुर्ण क्षमतेने भरुन दिलेला नाही.