नेवासा

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोट्यावधी रुपयांचे मंजूर कामे महायुती सरकारने स्थगित केली;आ. शंकरराव गडाख यांचा आरोप

ahmadnagar news : नुकताच प्रवरासंगम येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्धार मेळावा पार पडला व या मेळाव्याला बेलपिंपळगाव गटातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावलेली होती. या मेळाव्याला आमदार शंकरराव गडाख यांनी मार्गदर्शन केले व या मेळाव्याच्या प्रसंगी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.

यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर आरोप केला की कोट्यावधी रुपयांच्या कामांना तालुक्यात मंजुरी मिळालेली होती.परंतु महायुती सरकारने राजकीय द्वेषातून  या कामांना स्थगिती देत तालुक्यातील विकास कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे सगळ्यांनी उभे राहणे गरजेचे असल्याचे आवाहन देखील आमदार शंकरराव गडाख यांनी याप्रसंगी केले.

 आमदार शंकरराव गडाख यांनी महायुती सरकारवर केले आरोप

कोट्यवधीच्या मंजूर कामांना या सरकारने केवळ राजकीय द्वेशातून स्थगिती देत विकासाला खिळ घालण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफी व शेतमालाला रास्त भाव मिळवून देणारे सरकार हवे असेल, तर जनतेने महाविकास आघाडीच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले.

प्रवरासंगम येथील निर्धार मेळाव्यात आमदार गडाख बोलत होते. या मेळाव्यास बेलपिंपळगाव गटातील ग्रामस्थ उपस्थित होते.प्रारंभी मोठ्या संख्येने उपस्थित युवकांनी आमदार गडाख यांचे फटाक्यांच्या आतशबाजीत तोफांची सलामी देऊन स्वागत केले.

उद्योजक राजेंद्र कदम यांनी प्रास्ताविक केले.आमदार गडाख म्हणाले माझ्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या महाराज – विरोधकांपासून तालुक्यातील जनतेने सावध रहावे. गटतट विसरून या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलात यातच आपले खरे यश आहे.

सकारात्मक – पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी – आपला नेहमी प्रयत्न राहिला. मात्र कोट्यवधी रुपये खर्चाच्या असंख्य मंजूर कामांना महायुती सरकारने – राजकीय द्वेशातून स्थगिती दिली. त्यामुळे तालुक्यातील वीज, पाणी, रस्त्यांसह विविध विकास कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न झाला. गोगलगाव येथील दिनकर मते दिनकर कदम, दादासाहेब शेळके, मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले,

संचालक बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. प्रा. सागर कदम यांनी आभार मानले. या मेळाव्याप्रसंगी गोधेगाव येथील चेअरमन नवनाथ पठाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार गडाख हेच आम्हाला पाणी, वीज, रस्ते या महत्वाच्या प्रश्नांवर न्याय देऊ शकणार आहेत, असे सांगितले. यावेळी अनेकांनी आमदार गडाख यांचे नेतृत्व स्वीकारत प्रवेश केला.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts