राहाता

समितीत कांद्याला व सोयाबीनला मिळाले असे भाव..

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रविवारी 2203 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

सोयाबीनला 6370 रुपये इतका सर्वाधिक भाव प्रतिक्विंटलला मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 2400 रुपये ते 2800 रुपये असा भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 1550 ते 2350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 600 ते 1500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला.

जोड कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला काल कमीत कमी 6100 रुपये, जास्तीत जास्त 6370 तर सरासरी 6200 रुपये असा भाव मिळाला.

गहू 1800 रुपये, बाजरी 1750 रुपये, तर हरभरा डंकी 4290 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. डाळिंबाच्या 456 के्रटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 96 ते 120 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंब नंबर 2 ला 71 ते 95 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. चिकूला प्रतिक्विंटल कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts