संगमनेर

Sangamner News : सुरक्षेच्या कारणास्तव आठवडे बाजाराच्या जागेत बदल

Sangamner News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आपल्या नियोजित पार्श्वभूमीवर दौऱ्याच्या मंगळवारी (दि.२) येणार आहेत.

त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आज सोमवारी नियमितपणे भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या जागेत ग्रामपंचायत प्रशासनाने बदल केला आहे.

आश्वीसह पंचक्रोशीतील गावातील शेतकरी, व्यापारी, बागायतदार तसेच लहान मोठे भाजीपाला व्यावसायिक हे आश्वी बुद्रुक येथे आज सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारासाठी येत असतात.

यातून मोठी अर्थिक उलाढाल होत असते. मात्र उद्या मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे आश्वी दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारतळावर मंडप व स्टेज उभारणीचे काम सुरु आहे.

यांची पाहणी करण्यासाठी प्रशासनातील मोठे अधिकारी आज सोमवारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तसेच शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागू नये,

यासाठी या ठिकाणी भरणारा आठवडे बाजार हा हनुमान मंदिर तसेच एसटी स्टँड परिसरात भरविला जाणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान शेतकरी, व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन समाजमाध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts