संगमनेर

Sangamner News : जप्त केलेल्या पिकअपची पोलीस वसाहतीमधून चोरी ! संगमनेरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner News : अवैध वाळूची वाहतूक करताना आढळल्याने महसूल खात्याने जप्त केलेली व पोलीस वसाहतीच्या प्रांगणामध्ये ठेवलेल्या पिकअपची चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर तालुक्यात होत असलेल्या बेकादेशीर वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी महसूल खात्याने कारवाई सुरू केली होती. या कारवाई मध्ये एक बिगर नंबरची पिकअप पकडली होती. ही पिकअप संगमनेर पोलीस वसाहतीच्या प्रांगणामध्ये लावण्यात आलेली होती.

महसूल अधिकाऱ्यांच्या कायदेशीर रखवालीतुन ही विना नंबरची ८० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पिकअप मोहन बारकू भोकनळ, शिवाजी राधाकिसन घुले (दोघे रा. मंगळापूर, ता. संगमनेर) यांनी २५ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान वाळूसह चोरून नेली.

याबाबत मंडळ अधिकारी बाबाजी किसन जेडगुले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहन बारकू भोकनळ, शिवाजी राधाकिसन घुले (दोघे, रा. मंगळापूर, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक धिंदळे हे करीत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts