अहमदनगर उत्तर

आगामी निवडणुकांबाबत ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्यक्त करून, आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी.

अशी घोषणा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भाजपाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील बोलता होती.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील कडाडून टीका केली आहे. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, कोविडचे संकट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील जनतेचे प्रश्न गंभिर बनले आहेत.

तीन पक्षांच्या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात कोणतेही स्वारस्य राहीले नाही. जनतेचा उद्रेक रस्त्यावर येऊ नये म्हणून सरकार फक्त जनतेवर दबाव आणत आहे.

प्रश्न सोडविण्याला महत्त्व देण्यापेक्षा जमावबंदी आदेश लागू करण्यातच सरकारचे महत्त्व अधिक दिसत असल्याचा टोला भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. यापुढील सर्व निवडणुका या भाजपाच्या झेंड्याखालीच लढविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts