राहाता तालुक्यातील महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून राहता तालुक्यातील अर्थकरण वाढले पाहिजे या हेतूने राहता तालुक्याची निर्मिती करून अल्पावधीत राहता तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात स्थिरता आली पाहिजे या हेतूने विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्वसामान्य जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास राहता तालुक्यातील मागासवर्गीय समाजाचे राहता तालुक्यातील कार्यकर्ते अजय सोपानराव जगताप यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
अजय जगताप म्हणाले की महिलांना न्याय मिळावा म्हणून राहता पंचायत समितीच्या प्रथम सभापती म्हणून सुमनताई जगताप यांना संधी देऊन सर्व समाजाला बरोबर घेण्याचे काम केले आहे
राहता तालुक्यातील सर्वाधिक गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबांना पंतप्रधान आवास योजना शबरी रमाई या योजनेअंतर्गत हक्काचे घरकुल देखील उपलब्ध करून दिलेले आहे त्याबरोबरच या मतदारसंघात बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे
या हेतूने रेल्वे विमानतळ भव्य असे बसस्थानक विविध शासकीय इमारती उपजिल्हाधिकारी कार्यालय त्याबरोबरच शासकीय योजनेतून महिलांना विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहे.
त्यामुळे विखे यांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराकडे कुठल्याही प्रकारे जनतेच्या हितासाठी कुठल्याही प्रकारची कामे न करता केवळ निवडणुकीत उभे राहून नकारात्मक पद्धतीने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या तालुक्यातील जनता कधी सहन करणार नसून
येत्या २० तारखेला मोठ्या मताधिक्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील विजयी होतील असा विश्वास मागासवर्गीय समाजाचे कार्यकर्ते भाऊसाहेब सातदिवे गौतम गोडगे बाळासाहेब धीवर अनिल सोनवणे बीके जगताप रवींद्र जगताप संजय भालेराव आदी कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे