शिर्डी

Shirdi News : अंगणवाडी सेविकांचा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका -मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिडर्डीत धडक मोर्चा काढून अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. मोर्चा नगरपरिषदेपासून घोषणा देत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी दिलेल्या निवेदनात गॅच्युईटीबाचत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे चेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा मिळावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून योगदान न घेता दरमहा पेन्शन द्यावी,

यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनिस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र चावके, अध्यक्ष कॉ, मदिना शेख, सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, उपाध्यक्ष कॉ. शरद संसारे यांची भाषणे झाली, याप्रसंगी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचारी सोमवार दि. ४ डिसेंबरपासून संपावर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत, याकडे शमानाचे लक्ष येत्या हिवाळी अधिवेशनात नागपुर येथे अंगणवाडी कृती समितीच्या वतीने दि. १५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चाही काढण्यात येणार आहे. शासनाने तातडीने सर्व प्रसन्न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, अध्यक्ष कॉ. मदिना शेख, सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, कॉ. शरद संसारे, मीना कुटे, रागिणी जाधव, वंदना गमे, सारिका गायकवाड, नंदा नरोडे, मनिषा जाधव, सरला राहणे, मंषा वाबळे, शकीला पठाण, ज्योती डहाळे, सपना जाधव, लीलाताई सोनवणे, सीमा आरगले, पौर्णिमा खरे, ज्योती जपे, मांगदले पारधे, सुरेखा पाळदे, सथिता लहारे, वैशाली चीवर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होत्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Shirdi News

Recent Posts