शिर्डी

मोठी बातमी ! शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारला.

ते शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत. त्यांच्या मुंबईच्या घरी ही छापेमारी करण्यात आली असून राहुल कनाल मातोश्रीचे निकटवर्तीय मानले जातात.

राहुल कनाल नेमके आहे तरी कोण ?

राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत

मातोश्रीच्या जवळचे म्हणून राहुल कनाल यांची ओळख

युवा सेना कोअर कमिटीत राहुल कनाल आहेत

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांच्या नावाची चर्चा होती

महापालिकेत शिक्षण समिती सदस्य देखील राहिले आहेत

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts