शिर्डी

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष…

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष असल्याने ते निवडून येणार नाही असे जनतेचे ठाम मत आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवावी असा लोकांकडून आग्रह आहे जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

उमेदवार बदलला तर जागा वाचेल त्यामुळे मी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे वर्षानुवर्ष सर्व तक्ता केंद्रे एकच कुटुंबात असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे यापूर्वी आपण विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज देऊन 11 फेऱ्यामध्ये तेरा हजार मतांनी पुढे होतो.

विजयाच्या जवळ पोहोचलो होतो त्यानंतरच्या निवडणुकीत मी वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रशस्तीत पाळली हे लक्षात घेऊन आपणास येथून उमेदवारी मिळावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांना भेटून करणार आहे अशी माहिती भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपळा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे डॉ राजेंद्र पिपाडा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधकांना खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला जातो जो विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असतो त्याच्या विरोधात आपल्या बगलबच्च्यांना पत्रके काढायला लावली जातात विरोधात उभा राहिलेला उमेदवार मॅनेज आहे अशी चर्चा करून बदनामी केली जाते.

सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की राजेंद्र पिपाडा कधीही मॅनेज झाले नाही आणि होणार नाही विरोधाकांवर ॲट्रॉसिटी व विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल केले जातात मी न पाहिलेल्या जिल्ह्याबाहेरील माणसाने माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोडा गुन्हा दाखल केला होता आमच्यावर जीव घेणे हल्लेही झालेले आहे मात्र आपण या दडपशाहीस पुरून उरलो आहे विरोधकांवर हल्ले केले जातात काही वर तर हल्ले घडून त्याचे हात पाय मोडण्याच्या घटना यावर्षीच घडले आहे दहशत आणि दडपशाही सुरू आहे विरोधकांची अडवणूक करणाऱ्यांचे आणि जिरवा जिरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानली जात आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासाचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे गुन्हेगारांनी छान मांडला आहे ही परिस्थिती आपण बदलू शकतो हे राहता पालिकेच्या माध्यमातून आपण दाखवून दिले मोडकलीला आलेले गोदावरी कालवे खड्ड्यात गेले शिर्डी नगर रस्ता आणि 55 वर्ष होऊनही नीलवंडे कालव्याचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात गेले नाही या महत्त्वाच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती दाखवली जात नाही.

साई संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारे प्रकल्प राबवले जात नाही रोजगाराची साधने नसल्याने युवक बेरोजगार आहे शेतीला पाणी नसल्याने सामान्य शेतकरी आणि विकास ठप्प झाल्याने जनता भरडली जात आहे आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न व संवेदना आपल्याला समजतात साई मंदिर परिसराचे दरवाजे सामान्य भाविकांसाठी का खुले केले जात नाही असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले आहे.

गोदावरी कालव्यातून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही साई संस्थान 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रश्न शिर्डी व परिसरात होणाऱ्या सूर्या व शिर्डी मतदार संघात असलेली गुन्हेगारी व गुन्हेगारांना मिळणारे राजकीय पाठबळ असे एक ना अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे हे प्रश्न आपण मार्गी लावू शकतो असा जनतेचा विश्वास आहे यापूर्वी आपण या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवली जोरदार झुंज दिली आणि विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलो होतो आपला थोड मतांनी पराभव झाला या पराभवानंतर देखील आपण जनते सोबतचा संपर्क कायम ठेवला राहता शहरवासीयांनी आपण केलेल्या कामाची पावती म्हणून पालिकेत दोन वेळा लोक नियुक्त नगराध्यक्ष म्हणून पत्नी ममता पितळा यांना राहत्याच्या जनतेने निवडून दिले.

आमच्या काळात सर्वसामान्य लोकांना सन्मानाने वागलो उप देऊन त्यांची विकास कामे करण्याचा प्रयत्न आम्ही केला एक मॉडेल होऊन राहता शहराचा विकास केला वीरभद्र मंदिरासमोरील अतिक्रमणे काढून बाजार तळाचे काँक्रिटीकरण केले राज्यातील एक स्वच्छ सुंदर व अद्यावत समशानभूमी विकसित केले राहता शहराची पाणीपुरवठा योजना जवळपास संपूर्ण केली वाड्यावर त्यावरील रस्त्याची कामे केली साई संस्थांच्या 598 कामगारांचा प्रश्नासाठी गेलेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत असून हा प्रश्न लवकरच सुटेल अशी अशा आहे व साई संस्थांच्या वतीने अद्यावत कॅन्सर उपचार रुग्णालय तसेच बर्निंग वाढ सुरू व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत साई संस्थांच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज झाले पाहिजे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

शिर्डीत गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही भाविकांच्या गळ्यातील दागिन्यांची राजरोस चोरी होते दुचाकी आणि चार चाकी वाहने चोरीला जातात वाहतूक पोलीस भाविकांच्या गाड्या अडून त्यांना अपवाच्या सव्वा पैशाची मागणी करतात संपूर्ण भारतातून साईभक्त हे शिर्डीत येत असतात परंतु महामार्ग वाहतूक पोलिसांकडून राज्यातील वाहनांची आरवणूक करून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे जनतेला ठाऊक आहे.

प्रस्थापितामार्फत गुन्हेगारीला शिर्डी मतदारसंघात प्रोत्साहन दिले जाते त्यामुळे जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे काही जणांनी साईबाबा संस्थानच्या मंदिर परिसराचे दरवाजे दोन वर्षापासून बंद ठेवायला भाग पाडले आहे सरकार असतानाही ग्रामस्थांना आंदोलन करावे लागते हे योग्य आहे का? साई मंदिरातील फुलहार प्रसाद बंद करायला त्यांनीच सांगायचे आणि समितीने मायला देखील त्यांनीच आदेश द्यायचे ही दुटप्पी भूविका शेतकरी व फुल विक्रेत्यांच्या लक्षात आली आहे गुलाबाची व इतर फुल उत्पादक शेतकरी आणि दुकानदार व छोटे विक्रेते हैराण झाले असल्याचे पिपाडा यांनी सांगितले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil
Tags: Shirdi News

Recent Posts