शिर्डी

Shirdi Vande Bharat : साईनगर रेल्वे स्थानकात वंदे भारत ट्रेन फक्त १४ मिनिटांत स्वच्छ

Shirdi Vande Bharat : शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साईनगर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देशातील पहिल्यांदा जपानी तंत्रज्ञानाचा अवलंब करत अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन स्वच्छ केल्याने नवीन मानांक स्थापित केल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाचे प्रबंधक निराजकुमार डोहरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने रेल्वे सफाईच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून अचूकता आणि समन्वयाच्या उल्लेखनीय प्रदर्शनात, विभागाने ट्रेन क्रमांक २२२२३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- साईनगर शिर्डी वंदेभारत एक्स्प्रेसची अभूतपूर्व १४ मिनिटांच्या कालावधीत यशस्वीरीत्या साफसफाई केली आणि जपानी शिकानसेन (बुलेट ट्रेन) १४ मिनिटांच्या क्लीनिंग मिरॅकल’ धर्तीवर एक नवीन मानक स्थापित केले आहे.

एकूण १६ डब्यांचा समावेश असलेली निवडलेली ट्रेन सकाळी साडेअकरा वाजता साईनगर शिर्डी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पोहोचली आणि ऑपरेशन सुरू झाले. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जलद आणि प्रभावी कामामुळे सकाळी ११ वाजून ४५ मिनिटापर्यंत प्रवाशांना पूर्णपणे उतरवून सफाई कामगारांनी १२ वाजता ट्रेनमध्ये सफाई सुरू केली.

संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, नियमित घोषणा केल्या गेल्या. प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि धीराने साफसफाईची प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले. ट्रेन सकाळी १२ वाजून १४ मिनीटांपर्यंत प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी सज्ज झाले होते.

१६ डब्यांच्या साफसफाई प्रक्रियेत विविध कामे करण्यात आली. या चाचणीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ४८ सफाई कर्मचारी, १० सुरक्षा कर्मचारी, वाणिज्य-१५ यांच्या प्रयत्नामुळे यश आले.

याप्रसंगी विभागावीय रेल प्रबंधक निराज कुमार डोहरे, वरिष्ठ यांत्रिक अभियंता राहुल गर्ग, विभागीय वाणिज्य प्रबंधक एल. के रणयेवले यांच्या नेतृत्वाखाली प्रायोगिक चाचणी तत्त्वावर करण्यात आलेली ही ट्रेन साफसफाई खूप यशस्वी ठरली असून त्याची नियमित अंमलबजावणी सक्रिय विचारात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts