अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- तुमच्या आशीर्वादाने तालुक्याला प्रथमच मंत्रिपद मिळाले. या पदाचा वापर फक्त विकास कामांसाठीच करणार आहे. मंत्रिपदापेक्षा मला सर्वांचे प्रेम महत्त्वाचे आहे.
नेवासे तालुक्यातील रस्त्यांचा मोठा बॅकलॉग आहे. येत्या काळात सर्व रस्ते करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. उसाची चिंता करू नका सर्वाची ऊस तोडणी वेळवरच होईल, असे नियोजन केले आहे, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.
तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे मा. व्हा. चेअरमन भाऊसाहेब पा. मोटे, होते, तर कार्यक्रमासाठी माजी संचालक संजय आहेर,
सखाराम कर्डिले, वासुदेव आहेर, म्हसुदेव आहेर, विठ्ठल आहेर, दत्तात्रय कर्डिले, संजय आहेर, उद्धव कर्डिले, भिकाजी आहेर, सुनील कर्डिले, अंकुश कर्डिले बाबासाहेब कर्डिले,
गोरख चव्हाण, अरुण सावंत चेअरमन, प्रशांत कर्डिले, हरिभाऊ आहेर, गोविंद बर्डे उपस्थित होते. मंत्री गडाख म्हणाले, नेवासे तालुक्यातील रस्ते,
वीज या प्रश्नाबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना सुरू अाहेत. तालुक्यात नवीन ग्रामीण रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत.