अहमदनगर बातम्या

खा. अमोल कोल्हे यांना अहमदनगरमधील ‘त्या’ शासकीय कर्मचाऱ्याने केला फोन, शिवीगाळ..

Ahmednagar Politics : संगमनेर येथील एका शासकीय कर्मचाऱ्याने खासदार अमोल कोल्हे यांना मोबाईलवरून शिवीगाळ केल्याची घटना घडली. नारायणगाव पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री या कर्मचाऱ्याला संगमनेरातून ताब्यात घेऊन नारायणगावला नेले.

या कर्मचाऱ्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर येथील एका इसमाने खा. अमोल कोल्हे यांना मोबाईलवरून दोन दिवसांपूर्वी शिवीगाळ केली होती.

नारायणगाव पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिवीगाळ करणाऱ्याचा शोध सुरू केला. तपास केल्यानंतर हा कर्मचारी शहरातील वकील कॉलनीत राहात असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी जेव्हा त्याच्या घरी जाऊन पाहणी केल्यानंतर आरोपी तेथे झोपलेला आढळला.

पोलिसांनी त्याला झोपेतून उठवले व ताब्यात घेतल्याची माहिती समजली. शिवीगाळ ज्या मोबाईलवरून करण्यात आली तो मोबाईल संगमनेर तहसील कार्यालयात आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा असल्याचे माहिती पोलिसांस समजली.

परंतु, आपण फोन केला नसल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितल्याने या कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून कोणी फोन केला हा खरा प्रश्न असून पोलीस तपास करत आहे. दरम्यान, नारायणगाव पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हा कर्मचारी संगमनेर तहसील कार्यालयात काम करतो. माफीनाम्यानंतर या प्रकरणावर पडदा पडल्याची माहिती समजली अशीही माहिती समजली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts