Ahmednagar news : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आगामी काळात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा यांच्याशी काम करायला आवडेल असे सांगत आपण शरद पवार आणि अजितदादा यांच्यात मध्यस्ती करणार असल्याचे अप्रत्यक्षपने कबूल केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या राज्यभराचे लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला.या निकालानंतर खासदार लंके यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. या दरम्यान खासदार लंके यांनी एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.
या वेळी लंके यांनी आमदार ते खासदार या दरम्यानचा प्रवास कसा घडला याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण आमदार होतो या दरम्यान झालेल्या बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून निलेश लंके यांना उतरवल्यास हि जागा निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला होता.
त्यानुसार शरद पवार यांनी लंके यांना लोकसभेची उमेदवारी करण्याबाबत गळ घातली होती. मात्र नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले.
यावेळी राज्यात अजितदादा यांचे राजकारण टिकावे यासाठी आपण त्यांच्या सोबत गेलो. मात्र मला शरद पवार यांनी दिलेले प्रेम त्यांचे आशीर्वाद देखील महत्वाचे होते. मात्र त्याचसोबत लोकसभेबाबत शरद पवार यांना दिलेला शब्द हा माझ्यासाठी प्रमाण होता त्यामुळे तो पाळणे गरजेचे होते.
असे सांगताना लंके यांनी आपल्या विजयात ज्या ज्या अदृश्य शक्तीचा उल्लेख केला होता, प्रचारादरम्यान कसे नियोजन केले त्याबाबत देखील अनेक गुपिते सांगितली. यात प्रामुख्याने भाजपातील अनेक नाराज असलेल्या अनेक नेत्यांनी माझी मदत केली असल्याची देखील माहिती दिली.
दरम्यान या राजकीय घडामोडीत मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मात्र पुढील काळात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा यांच्याशी काम करायला आवडेल असे सांगत आपण शरद पवार आणि अजितदादा यांच्यात मध्यस्ती करणार असल्याचे अप्रत्यक्षपने कबूल केले.