Ahmednagar Politics :- अहमदनगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत सुरु असणारी धुसफूस, विखे पाटील घराण्याविरोधातील सूर हे एकीकडे सुरु असतानाच आता एक मोठी घडामोड घडली आहे. आ.निलेश लंके व आ. राम शिंदे हे एकत्रित भेटले आहेत.
आमदार निलेश लंके हे महिलांना मोहटा देवीचे दर्शन करण्यास घेऊन जातात. काल (18 ऑक्टोबर) तेथे जात आ.राम शिंदे यांनी लंके यांची भेट घेतली. तेथे त्यांनी आ. लंके यांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे आ. लंके यांनी स्वतः आ. शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य करत मोहटा देवी गडावर नेले. तेथे दोघांनीही एकत्रित देवीची आरती केली.
राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो असे म्हटले जाते. कदाचित याचाच आधार घेत हे दोघे एकत्र येतायेत का अशी चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आ. लंके उभे राहतील असे म्हटले जात आहे.
मागील काही दिवसांचा इतिहास पाहिला तर आ.राम शिंदे हे सरळसरळ विखे यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे शिंदे यांची मदत लोकसभेला होईल असे बहुतेक लंके यांना वाटत असावे. या उलट जर ही जागा भाजप कडे आली तर आमदार राम शिंदे हे या जागेसाठी आग्रही आहेत.
जर त्यांना ही जागा दिली तर आ. लंके हे विखे यांचं राजकीय विरोधक आहेत हे सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे तेथे त्यांना आ. लंके यांची मदत होऊ शकते. म्हणजेचज काय तर महायुतीत जागा वाटप कसेही झाले तरी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो या तत्वानुसार हे दोघे एकत्र आले तर नवल वाटायला नको.
मोहटादेवी गडावर दर्शनाला जाताना आ. राम शिंदे यांनी निलेश लंके यांची भेट घेतली. ते जो उपक्रम राबवत आहेत तो अत्यंत कौतुकास्पद आहे असे ते म्हणले. तसेच मोहटा देवी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत असे देखील म्हटले आहे
लंके-शिंदे हे जर एकत्र आले तर खा. सुजय विखेंना मोठे आवाहन मिळेल. आ. राम शिंदे व मंत्री विखे यांच्यात काही राजकीय आलबेल नाही हे अनेकांना माहित आहे. तसेच आ.लंके हे देखील विखे यांचा उघड उघड विरोध करत असल्याचेही सर्वश्रुत आहे. आता या दोघांची भेट किंवा यांचे एकत्रित येणे हे खा. सुजय विखेंना मिळणार तगडे आव्हान आहे अशी चर्चा रंगली आहे.