अहमदनगर बातम्या

लाडकी बहीण योजना निवडणुकांपुरतीच असेल? खासदार नेमके काय बोलून गेले? पहा..

Ahmednagar Politics : सरकार मनाला येईल ते करतंय. कोर्टानेही सरकारला फटकारले. राज्य कर्जात बुडालेले असतानाही लाडक्या बहिणींसाठी ४६ हजार कोटी दिले जाणार असल्याने हे कर्ज काढणार आहेत. ही योजना फक्त निवडणूक होईपर्यंत आहे.

याआधीही निवडणूक झाल्या की अशा योजना बंद पडल्याचे समोर आले आहे. सरकारला सद्बुद्धी द्यावी. राजकारणासाठी महाराष्ट्राला लुटले जात आहे. अशा खोचक शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर शिर्डीत टीका केली.

खा. अरविंद सावंत यांनी मंगळवारी शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की रवी राणा यांच्या पोटातील विष आता ओठांवर आले आहे.

महाराष्ट्राने याची दखल घेतली पाहिजे. मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिण योजनेचे पुढे काय झाले, याची माहिती घ्या. निवडणुकीपुरतं हे सोंग आहे. या सोंगापासून सावध राहा. बहिणींनी पैसे घ्या, सोडू नका.

प्रत्यक्षात किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतो, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जनतेचा पैसा आहे. सरकारचा खिशातील नाही.

ही योजना फक्त निवडणूक होईपर्यंत आहे. याआधीही निवडणूक झाल्या की अशा योजना बंद पडल्याचे समोर आले आहे. सरकारला सद्बुद्धी द्यावी. राजकारणासाठी महाराष्ट्राला लुटले जात आहे.

जनमाणसांचे डोळे उघडले पाहिजे. लोकसभेचा वेळी जे कर्तव्य जनतेने दाखवले, तेच आता विधानसभेलाही ते दाखवतील, महाराष्ट्र धर्म रामदास स्वामींनी पुकारला होता. हाच महाराष्ट्र धर्म आज अक्षरशः बुडाला आहे. रोज एक कारखाना परराज्यात जातोय, कालही महाराष्ट्रातील ‘महिंद्रा’चा एक कारखाना गुजरातला पळवला,

राज्यातील तरुणांनी करायचे काय? सत्तेवर बसलेले ब्र सुद्धा काढायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना सत्तेवरून दूर करणे जनतेचे परम कर्तव्य आहे. त्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आल्याचे खा. सावंत यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी विश्वस्त सचिन कोते, तालुकाध्यक्ष संजय शिदि, नाना बावके, सुयोग सावकारे, अमोल गायके, पुंडलिक बावके यांनी खा. सावंत यांचा सत्कार केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts