Ahmednagar School News : ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली की फेस्टिव्ह सीजन सुरू होत असतो. दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीच्या हंगामाला सुरुवात होत असते. आता संपूर्ण देशभर विविध सणांची रेलचल पाहायला मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातही अनेक मोठमोठे सण आगामी काळात साजरी केले जाणार आहेत. सणासुदीच्या दिवसात शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर होत असते.
दरम्यान अहमदनगर मधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की उद्या अर्थातच 12 ऑगस्ट 2024 ला सोमवार असतानाही अहमदनगर मधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना कुलूप राहणार आहे.
प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उद्या अहमदनगर मधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलेला आहे. यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जात आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर मराठा समाजाच्या माध्यमातून शांतता रॅली काढली जात आहे. नुकतीच ही रॅली पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून निघाली. या रॅलीला कोल्हापूरमध्ये चांगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, आता ही रॅली अहमदनगर मध्ये निघणार आहे. उद्या अहमदनगर शहरात शांतता रॅली काढली जाणार असून याच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर उद्या अहमदनगर मधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या रॅलीला हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील बांधव एकवटणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते, या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी प्रशासनाने उद्या म्हणजेच बारा ऑगस्टला शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे फक्त अहमदनगर शहरातीलच शाळांना सुट्टी राहील असे नाही तर उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुद्धा पूर्णपणे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उद्याच्या दिवसाच्या शैक्षणिक तासिका इतर दिवशी भरून काढाव्यात अशा सूचना आणि आदेशही प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी संबंधित शाळांना जारी करण्यात आले आहेत.