अहमदनगर बातम्या

अहमदनगर हादरलं ! पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, जबरदस्ती करणारा अवघा १३ वर्षाचा मुलगा

अहमदनगर जिल्ह्यातून अनेक खळबळ उडवून देणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येताना दिसतात.

दरम्यान आता अवघ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याचे वृत्त आले आहे. धक्कादायक म्हणजे १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने हा अत्याचार केला आहे. ही खळबळजनक घटना नगर शहरातील उपनगरात घडली.

समजलेली अधिक माहिती अशी : ही घटना सोमवारी घडली असून पीडित पाच वर्षाच्या मुलीला खेळण्यासाठी घरच्यांनी सोडले होते. तेव्हा या अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केलाय. पीडितेने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला.

त्यानंतर कुटुंबीयांनी बुधवारी पोलिसांत धाव घेतली. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली असून १३ वर्षीय मुलाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

७४ हजारांची सुगंधी तंबाखू जप्त
दुसऱ्या एका घटनेत, बोल्हेगाव परिसरातील प्रेमभारतीनगर येथे छापा टाकत तोफखाना पोलिसांनी मावा तयार करणाऱ्या दोघांना अटक केली असून, सुगंधी तंबाखू व सुपारी, असा एकूण ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी अक्षय कुंडलिक निकाळजे (वय २७, रा. प्रेमभारतीनगर, बोल्हेगाव) यास अटक करण्यात आली आहे. बोल्हेगाव परिसरात सुगंधी तंबाखूपासून मावा तयार केला जात आहे, अशी खात्रीशीर माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाठी यांच्यासह पथकाने निकाळे याच्या घरी छापा टाकला असता तो मावा तयार करताना मिळून आला. त्याच्या घराची झडती घेतली असता सुपारी, तंबाखू आणि सुपारी बारीक करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन, असा एकूण ७४ हजारांचा मुद्देमाल मिळून आला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts