अहमदनगर दक्षिण

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार केला; आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. या ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. अत्याचार करणारा तरूण समीर बालन शेख (वय 26 रा. आलमगीर, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 376, पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत समीर शेख याची ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने त्या मुलीला पळवून नेले.

तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान घरातून मुलगी गेल्यामुळे तिच्या घरच्यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी नोंद घेवुन तपास सुरू केला. समीर शेख व पीडित अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पूर्वी दाखल असलेल्या हरवल्याच्या गुन्ह्यात वाढीव पोक्सो, अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावले. समीर शेखला अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office