अहमदनगर दक्षिण

Ahmednagar Politics : विधानसभेलाही पारनेरच ठरेल लक्षवेधी ! ‘ही’ आहे इच्छुकांची फौज, अजित पवारांसोबतच विखेंचाही निघेल घाम

Ahmednagar Politics : ऑक्टोबर मध्ये साधारण विधानसभेच्या निवडणुका होतील असे अंदाज आता वर्तवण्यात येऊ लागले आहेत. त्यानुसार सर्वच पक्ष व इच्छुक तयारीला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदार संघ असून विधानसभेलाही शक्यतो पारनेर लक्षवेधी ठरेल असे चित्र आहे.

याचे कारण असे की येथे विधानसभेला इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे. त्यात अनेकांना लोकसभेवेळी वरिष्ठांनी आमदारकीचा शब्द दिल्याचेही चर्चा आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या भाऊगर्दीत सर्वांचीच कसरत होणार आहे. यामध्ये महायुतीकडून उभे राहण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेरमधून महायुती व महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण राहिल, हा प्रश्न तालुक्यातील सर्व कार्यकर्ते तसेच मतदारांना देखील पडलेला आहे, जो तो आपापल्या परीने आमचाच नेता आमदारकीला उभा राहणार आणि निवडूनही येणार अशा चर्चा व्हाट्सअप ग्रुप वर करत आहे.

कोणकोण उमेदवार इच्छुक ?
सध्या महायुतीकडून अनेक इच्छुक उमेदवार दिसत आहेत. यामध्ये सध्या नागरिकांत चर्चा असणारी जी नावे आहेत ती म्हणजे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, सुजित झावरे पाटील, काशिनाथ दाते सर, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे आदी नवे इच्छुकांच्या यादीत आहेत.

त्यात आता माजी आमदार विजय भास्कर औटी यांनी लोकसभेला खा. सुजय विखे यांना पाठिंबा दिला असल्याने त्यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कारवाई केलेली आहे. त्यामुळे आगामी कळत त्यांना तिकिटासाठी महायुतीचा पर्याय निवडावा लागेल अशी चर्चा आहे.

तसेच येथे निलेश लंके हे स्टँडिंग आमदार होते. लोकसभेच्या त्यांच्या जय पराजयवर पुढील त्यांच्या आमदारकीची दिशा ठरेल. तसेच निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या देखील आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. लंके समर्थकांकडून भावी आमदार राणीताई निलेश लंके असे पोस्टर देखील झळकवण्यात आले होते.

माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे आमदारकीला उभे राहणारच ?
माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचा देखील जनसंपर्क दांडगा आहे. तसेच त्यांनी एकदा काही झालं तरी आमदारकी लढणारच असेही म्हटले होते असे लोक म्हणतात. त्यामुळे ते देखील या लढाईचे स्वरूप पालटू शकतात असेही म्हटले जाते.

उपमुख्यंमत्री अजित पवारांसोबतच मंत्री विखेंचाही निघेल घाम
महायुतीमधील इच्छुकांची भाऊगर्दी पाहता कुणाला तिकीट द्यायचे व इतरांना कशा पद्धतीने सोबत घेऊन उमेदवार निवडून आणायचा हे करताना उपमुख्यंमत्री अजित पवारांसोबतच मंत्री विखेंचाही घाम निघेल हे मात्र नक्की.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts