अहमदनगर दक्षिण

भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्यावर कुऱ्हाडीने वार, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  रस्त्याने जाता येताना भूंकणाऱ्या पाळीव कुत्र्याला कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तालूक्यातील कोंढवड येथे ही घटना घडली.

गणपत म्हसे यांचा पाळीव कुत्रा रस्त्याने जाता येताना भूंकत असल्याने पोपट पवार (रा. कोंढवड) यांनी चिडून या कुत्र्याला कुऱ्हाडीने फटका मारून जखमी केले.

गणपत म्हसे यांनी जखमी कुत्र्याला घेऊन राहुरी पोलिस स्टेशन गाठत फिर्याद दिल्याने पवार यांच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

जखमी कुत्र्यावर राहुरीतील पशू रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेचा तपास काॅन्स्टेबल आव्हाड करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office