अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- शहरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानातून इलेक्ट्रीक साहित्य चोरले. हे चोरलेले साहित्य एका दुकानदारास विकले. आपल्या गोडाऊनमधून माल चोरी होत असल्याची खात्री संबंधित व्यावसाईकास झाली.(stolen ggods)
त्यामुळे त्याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी हा माल चोरणाऱ्यांसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या संबंधितावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे आता चोरीचा माल विकत घेणे त्यास चांगलेच महागात पडणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरमधील व्यापाऱ्याच्या गोडाऊनमधून गेल्या महिनाभरात वेळोवेळी सुमारे १ लाख रूपये किंमतीच्या इलेक्ट्रीक साहित्याची चोरी झाल्याची घटना सहकार सभागृह रोडवरील पर्वत हॉटेल शेजारी घडली.
याबाबत व्यापारी प्रदीप देवीचंद नहार (रा. पुष्कर हाईटस, आशा टॉकीजजवळ, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
नहार यांचे सहकार सभागृह रोडवर इलेक्ट्रीक साहित्याचे गोडाऊन असून या गोडाऊनमधून आदिनाथ कचरू येवले (रा. निमगाव, ता. नेवासा), बाळू रामदास निमसे (रा.वाळकी, ता. नगर),
शुभम शाम आरडे (रा. कामठी, ता.श्रीगोंदा) यांनी १५ नोव्हेंबरपासून १७ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत इलेक्ट्रीक साहित्याची चोरी करत तो माल अक्षय बाळासाहेब ससे (रा. दरेवाडी, ता.नगर) यास विकला असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सदरील चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.