अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- मागील काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, भरदिवसा घरे फोडली जात आहेत.एकीकडे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी घरातील सर्व सदस्य शेतात जातात हीच संधी साधून चोरटे बंद असलेले घर फोडून रोख रक्कम व दागीने चोरी करतात.
काल तर चोरट्यांनी एकाच दिवशी शहरतील तीन ठिकाणी घरे फोडून तब्बल सात लाखांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकारामुळे मात्र नागरिक व पोलिस देखील चांगलेच हैराण झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी शहरातील आनंदनगर ,मोहटा व चिंचपुर पागुंळ या तिन ठिकाणी चोरट्यांनी दिवसा घराचे कुलुप तोडुन २ लाख ९७००० रुपये रोख व ३ लाख २८ हजार ५०० रुपयाचे सोन्याचे दागीने असा एकूण ६ लाख ९५ हजार ५०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला आहे.
दिवसा होणाऱ्या घरफोडीचे प्रकार रोजच घडत असल्याने रात्रभर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना आता दिवसभर तालुक्याच्या ग्रामिण भागात फिरावे लागत आहे.
चोरट्यांनी रात्री चोरी करण्या ऐवजी दिवसा बंद गराचे कुलुप तोडुन चोरी करण्याचा सपाटा लावल्याने पोलिसही धास्तावले आहेत.
मोहटा गावातील आंबादास आश्रु दहीफळे हे दुपारी बारा वाजता कुंटुबासह शेतात गेले होते.
पाच वाजता घरी आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील अडीच लाख रुपये रोख व दोन लाख ५६ हजाराचे सोन्याचे दागीने असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.
दुसरी घटना शहरतील आनंदनगर भागातील सुभद्रा कचरु भोसले या घराचे कुलुप लावुन त्यांच्या दुसऱ्या घरी गेल्या.
भोसले या गुरुवारी परत आनंदनगर येथे घरी गेल्यानंतर घराचे कुलुप तोडलेले दिसले.
घरातील ३५ हजार रुपये रोख व २२ हजार पाचशे रुपयाचे सोन्याचे दागीने चोरट्यांनी चोरुन नेले होते.
तिसरी घटना चिचंपुर पांगुळ येथील डॉ.अशोक मुलरीधर बडे व त्यांचे आई-वडील शेतात गेले होते.
दुपारी मुरलीधर बडे घरी आले तेव्हा त्याला घराचे कुलुप तोडलेले दिसले.
घरातील १२ हजार रुपये रोख व ५० हजार रुपयाचे सोन्याचे दागीने असा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
तालुक्यातील तिनही ठिकाणच्या दिवसा झालेल्या घरफोडीत एकूण २ लाख ९७०००हजार रोख व ३लाख २८ हजार ५०० रुपयाचे सोन्याचे दागीने असा ६ लाख ९५हजार ५०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला आहे.